टीम मंगळवेढा टाईम्स।
पत्नीला माहेरी आणल्याने जावयाने सासरवाडी गुंजेगावात येवून मेव्हण्याला काठीने तर सासूला कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून या प्रकरणी जावई गोरख आप्पा कारंडे ( रा.जुनोनी ता . सांगोला ) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी कुंदा महादेव खटके (रा.गुंजेगांव) यांची मुलगी रुक्मिणी हिचे लग्न २००६ साली जुनोनी येथील गोरख आप्पा कारंडे याच्यासोबत झाले आहे.
रुक्मिणी हिस दोन मुले आहेत. फिर्यादीचा जावई तथा आरोपी गोरख यास दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो पत्नी रुक्मिणी हिस वारंवार भांडणे काढून मारझोड करीत असल्याने फिर्यादीचे पती व मुलगा लिंगाप्पा यांनी जावयाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र मागील आठ दिवसापुर्वी पुन्हा पत्नी रुक्मिणीबरोबर भांडणे काढून मारझोड केली. फिर्यादीचा मुलगा लिंगाप्पा याने जुनोनी येथे जावून रुक्मिणी हिस माहेरी गुंजेगाव येथे आणले होते.
दि.२५ जून रोजी सायंकाळी ४.०० वा . फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा लिंगाप्पा घरी असताना आरोपी तथा जावई गोरख कारंडे याने गुंजेगाव येथे येवून माझे बायकोला तुमच्या घरी का आणले असे म्हणून भांडणे काढली.
यावेळी फिर्यादीने तुम्ही दारू पिवून माझे मुलीस मारहाण करता व भांडणे काढता असे म्हणत असताना घराच्या बाजूला पडलेली काठी घेवून आरोपीने फिर्यादीचा मुलगा लिंगाप्पा याच्या उजव्या पायावर, पाठीवर काठीने मारहाण केली.
यावेळी फिर्यादी सासू व पत्नी रुक्मिणी यांनी आरोपीच्या हातातील काठी हिसकावून घेतली असता आरोपीने चिडून जावून घराजवळ असलेली कुऱ्हाड घेवून कुऱ्हाडीच्या तुंब्याने फिर्यादीच्या कपाळाजवळ व डाव्या हाताच्या पंजावर मारून जखमी केले.
सदर घटना सुरु असताना भांडणे पाहून शेजारचे नातेवाईक सोमनाथ काळे , सिंधूबाई काळे यांनी येवून भांडणे सोडवा सोडवी केली. तदनंतर आरोपी शिवीगाळ व दमदाटी करीत निघून गेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक विठ्ठल विभुते हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज