टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी अकलूज येथील डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते- पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर अकलूज मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. अलीकडेच डॉक्टर धवलसिंह मोहिते- पाटील यांनी शिवबंधन तोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.
काँग्रेस प्रवेशानंतर धवलसिंह मोहिते- पाटील यांच्यावर कोणती जबाबदारी देण्यात येणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांनमध्ये दिसून येत आहे.
अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असतानाही डॉक्टर धवलसिंह मोहिते- पाटील यांनी या निवडीमध्ये चांगलीच बाजी मारली आहे. डॉक्टर धवलसिंह मोहिते- पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांचे संघटन कौशल्य असल्याने सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस वाढीसाठी संधी आहे.
यामुळेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मोहिते- पाटील यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे. त्यातच भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांना ही एक प्रकारे काँग्रेसने डॉक्टर धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या रूपाने शह देण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर धवलसिंह मोहिते- पाटील हे आता काँग्रेसला किती बळ देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज