mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; मेव्हणीनंतर आता बायकोची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 4, 2021
in राज्य
आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे मुंडेविरोधात तक्रार केली आहे. त्यात गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहेत. शिवाय पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

करुणा यांनी पोलीस आयुक्ताकड़े दिलेल्या अर्जामध्ये माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत.

मला त्यांच्याशी भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बँगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही.

मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे.

त्यामुळे चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आजाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दया. आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

कोण आहेत करुणा धनंजय मुंडे ?

मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यात करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती.

सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे.

ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं.

करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे.

या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत. मात्र २०१९९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. असे नमूद केले होते.

तक्रार अर्जात करुणा धनंजय मुंडे नावाचा वापर

करुणा शर्मा यांनी आयुक्त कार्यालयात दिलेल्या अर्ज़ात करुणा धनंजय मुंडे असा उल्लेख केला आहे.कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आराेप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली तरी पुन्हा एक नवं संकट मुंडेंच्या मागे लागले आहे.

कौटुंबिक कारण तसेच या तक्रारीमुळे होत असलेल्या राजकारणामुळे माघार घेत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. याबाबत ट्विट करून त्यात मुंडे यांच्याविरोधात कुठलीही तक्रार नसल्याचे तिने नमूद केले.

तरुणीने मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर तिच्यावरही आराेप करण्यात आले हाेते. तिने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप भाजप नेते कृष्णा हेगडे व त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनी केला.

याप्रकरणी अंबोली पोलिसांकडे तक्रार अर्जही दिला हाेता, तर गेल्यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही तक्रारदार तरुणीविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तरुणी मुंडे यांना अनेक वर्षांपासून ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे मुंडे हे तणावात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.

काय म्हणतात करुणा ?

आज माझा वाढदिवस आहे, परंतु माझ्या पतीने माझ्या मुलांना 3 महिने चित्रकूटमध्ये त्यांच्या बंगल्यात लपवून ठेवले आहे आणि मला भेटू, बोलूही देत नाही. राजकीय ताकदीचा दुरूपयोग केला जात आहे. रावणानेही इतका अत्याचार केला नसता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अडचणीतधनंजय मुंडेराष्ट्रवादीवाढ

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
Next Post
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

सोने-चांदी आणखी झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा