टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुवारी दुपारी २ वाजता सांगोला दौऱ्यावर येत आहेत. हेलिकॉप्टरने सांगोला महाविद्यालय आगमन,
तेथून मोटारीने दुपारी २:१० मिनिटांनी सांगोला न्यू इंग्लिश स्कूल च्या प्रांगणात महाआरोग्य शिबिरास भेट, दुपारी २:३० वाजता माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयास भेट व राखीव,
तेथून त्यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता अंबिका मंदिरासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती सोलापूर येथून पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
त्यानंतर दुपारी ३:३० वाजता त्यांच्या उपस्थितीत सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात जाहीर सभा होणार आहे.
सायंकाळी ४:४५ वाजता मोटारीने सांगोला महाविद्यालय आगमन व हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयान करणार असल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, पर्यटन खणीकर्म मंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री जयकुमार गोरे सार्वजनिक व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज