मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाला रोखण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे . आरोग्यमंत्री म्हणाले , गरज भासल्यास राज्यात आरोग्यसेवेसाठी पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ असावे यासाठी राज्यातील आयुर्वेदिक , युनानी , होमिओपॅथी या आयुष डॉक्टरांची सेवा घेता यावी याकरिता त्यांना आठवडाभरात कोरोनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आत्तापर्यंत आयुषच्या २५० मुख्य प्रशिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे . खासगी दवाखाने बंद ठेवले असून डॉक्टरांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी त्यासाठी योग्य आहार , व्यायाम,पुरेशी झोप आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज