मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । माहेरहन दोन लाख रुपये व एक तोळे सोन्यासाठी विवाहितेचा सासरी छळ केल्याबद्दल चौघांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सादयां आनंद वाघमारे ( वय २१ , रा . रामवाडी) यांच्या फिर्यादीवरून आनंद मल्लिकार्जुन वाघमारे , मल्लिकार्जुन धुळप्पा वाघमारे , लक्ष्मी मल्लिकार्जुन वाघमारे , संतोष मल्लिकार्जुन वाघमारे ( सर्व रा . रामवाडी ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
सासरच्या मंडळींनी सौंदर्या हिस लग्न झाल्यापासून हुंड्याची रक्कम दोन लाख रुपये व एक तोळे सोने आणण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन क्रूर वागणूक देऊन जाचहाट केला तसेच दीर संतोष याने तिला काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज