मंगळवेढा टाईम्स टीम । युरोपातील ११ देशांमध्ये लॉकडाऊन आणि इतर उपायांमुळे कोरोना संसर्गाच्या प्रसाराला थोपवण्यात आले आहे.लंडनमध्ये केलेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. युरोपातील ११ देशांमध्ये लॉकडाऊन ९९.९ टक्के यशस्वी झालेला आहे. Corona slows down proliferation Lockdown in Europe 100% successful
बेल्जियम , जर्मनी , स्वीडन , स्वित्झर्लंड , फ्रान्स , इटली , स्पेन , ब्रिटेन , डेन्मार्क , ऑस्ट्रिया आणि नॉर्वे या ११ देशांमध्ये येथील लोकसंख्येच्या ३.२ ते ४ टक्के लोक करोनाबाधित झाले आहे. मात्र , मार्चअखेर या देशांमध्ये कडक लॉकडाऊनचे पाऊल उचलण्यात आले. यात शाळा , धार्मिक स्थळे बंद , सोशल डिस्टन्सिंग , मास्क यासारख्या उपाययोजनांचा अवलंब केला गेला.यामुळे या देशांना फायदा झाल्याचे समोर आले आहे.
मे च्या पहिल्या आठवड्यात या देशांमध्ये लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. या देशांनी करोना रिप्रॉडक्शन रेटला एक टक्का खाली आणले आहे. तर , बेल्जियमसारख्या देशात करोनाबाधितांचा रेट सर्वांत जास्त ३.८ इतका होता. येथे ही साथ धोकादायक पातळी पार करू शकत होती.
एवढेच नव्हे , तर ३१ लाख लोकांचा मृत्यूही झाला असता . मात्र , लॉकडाऊनमुळे बेल्जियमने करोनाच्या विळख्यातून सुटका केल्याचे दिसते आहे.
तर प्रकोप वाढला असता
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने By the University of California केलेल्या संशोधनात चीन , अमेरिका , दक्षिण कोरिया , इटली , इरान आणि फ्रान्स China, USA, South Korea, Italy, Iran and France या सहा देशांमध्ये लॉकडाऊनसह १ हजार ७१७ उपायांचे विश्लेषण करण्यात आले. यात असे आढळून आले की , जर लॉकडाऊन आणि इतर उपाययोजना केल्या नसत्या तर चीनमध्ये करोनाचा प्रकोप ४६५ पटीने , इटलीमध्ये १७ पटीने आणि अमेरिकेत १४ पटीने वाढला असता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज