mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

BREAKING I पोलीस दलात कोरोनाची धडक ; सोलापुरातील नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
BREAKING I पोलीस दलात कोरोनाची धडक ; सोलापुरातील नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्याच संपर्कातील आणखी नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज (रविवारी) दिली. तर शहरातील तीन पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

शहर जिल्ह्यातील नागरिक कोरोनापासून दूर राहावेत, या हेतूने 22 मार्चपासून राज्यातील पोलिस कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यांवर पहारा देत आहेत.

शहर जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सातत्याने करूनही अनेक शहर जिल्ह्यांमधील नागरिक ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. सोलापूर शहर हद्दीत आठ ठिकाणी तर शहरांतर्गत सात ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. तर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जेणेकरून विनाकारण कोणीही परी जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येणार नाही, अशी खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. तरीही ग्रामीण पोलिस दलातील 13 तर शहर पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आता समोर आले आहे. त्यांच्या संपर्कातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध तातडीने घेतला जात असून त्यापैकी काहींना वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.


शहर पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुमारे 80 ते 90 जण आल्याचा अंदाज आहे. तर ग्रामीण पोलिस दलातील या नऊ कर्मचाऱ्यांच्या संपर्कात नेमके किती पोलिस अधिकारी व कर्मचारी आले, याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. तत्पूर्वी, ग्रामीण पोलिस दलातील कोरोना पॉझिटिव्ह चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील 68 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. 

त्यापैकी 48 कर्मचारी आयसोलेशन वॉर्डमध्ये तर 20 कर्मचारी होम क्वारंनटाइन करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, याची खबरदारी म्हणून ग्रामीण पोलिस दलातील 55 वर्षांवरील 14 पोलिस अधिकारी व 138 कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

——————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
बापरे…सोलापूरकरांच्या चिंतेत वाढ एकाच दिवशी 48 कोरोना रुग्णांची भर ; वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण

बापरे...सोलापूरकरांच्या चिंतेत वाढ एकाच दिवशी 48 कोरोना रुग्णांची भर ; वाचा 'कुठे' वाढले रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 25, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 25, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा