मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पीएम सूर्यघर योजनेतून घरांवर सौरऊर्जा पॅनल बसवण्याचे काम करणाऱ्या तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ‘महावितरण’च्या कंत्राटी कर्मचारी योगीनाथ म्हेत्रे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मंगळवारी रंगेहाथ पकडले.
म्हेत्रे याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरत व्हनमाने यांच्यासाठी ५ हजार आणि सहायक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी ३ हजार रुपये लाच स्वीकारल्याचे कबूल केले आहे.
या प्रकरणी तिघांविरुद्ध फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदाराकडे सातत्याने लाचेची मागणी होत असल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. विभागाने सापळा रचून म्हेत्रे आणि सहायक अभियंता स्वाती सलगर यांना ताब्यात घेतले.
मात्र, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्हनमाने रजेवर असल्याने त्यांना अटक झालेली नाही. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने केली.
या घटनेमुळे सौरऊर्जा योजनेत लाचखोरीचा प्रकार समोर आला असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कठोर कारवाईचे संकेत दिले असून, पुढील तपास सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज