मंगळवेढा शहरातील एका व्यक्तीचा गुरुवार दि.9 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.सदर व्यक्ती मंगळवेढा येथील स्थानिक रहीवासी आहे त्या व्यक्तीचे संपर्कात आलेले high risk contacts 35 आहे. त्यांना मंगळवेढा येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करणेत आलेले आहे. त्या व्यक्तीचे संपर्कात आलेले low risk contacts 84 असुन त्यांना होम कोरोनटाईन करणेत आलेले आहे.
मंगळवेढा शहरामध्ये कोरोना या आजाराचा प्रार्दुभाव वाढु नये या करीता मंगळवेढा शहरातील गुंगे गल्ली, मंगळवेढा नगरपरिषद हद्द परीसर,मंगळवेढा शहरालगत ग्रामीण परीसर आणि शहरालगत असलेल्या दोन ग्रामपंचायती श्री.संत दामाजीनगर व श्री.संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परीसर व त्याच्या आजुबाजुच्या एककिलो मीटर पर्यंतचा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र (Containment Zone) म्हणुन घोषीत करणेत आलेला आहे.
तसेच सदर प्रतिबंधीत क्षेत्रापासुन तीन कि.मी. पर्यंतचे परिसर बफर झोन म्हणुन घोषीत करणेत आलेला आहे. सदर प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये (Containment Zone) अत्यावश्यक सेवा वगळुन इतर सर्व सेवा आणि आस्थापना पुढील आदेश होईपर्यत बंद करणेत आलेल्या आहेत.
सदर ठिकाणी प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली असून, आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
शहरातील गुंगे गल्लीमधील एक 55 वर्षीय व्यक्ती सारीग्रस्त आढळून आल्याने नगरपालिकेने सकाळी हा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला.या परिसरात येणारे रस्ते बॅरेगेटस लावून पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. या गल्लीतील कचरा गोळा करून निर्जंतुकीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.या साथीला रोखण्यासाठी प्रशासनाने बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवेढा शहर जवळपास 100 टक्के बंद स्थितीत आहे.शुक्रवारी दुपारी प्रांताधिकारी भोसले यांनी सर्व अधिकार्यांची बैठक घेवून कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना दिल्या.या बैठकीत मेडिकल,दवाखाने व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असा निर्णय झाला.
नगरपालिका हद्दीत पाच जणांचे पथक कार्यरत ठेवले असून हे पथक वार्डनिहाय फिरून कुटूंबात तापाच्या रूग्णाबाबत शोध घेतला जाणार आहे. दरम्यान,या लोकांचे स्वॅब घेण्याची तयारी सुरु आहे.एका हॉस्पीटलची रुग्णसेवा बंद करण्यात आली आहे.एका डॉक्टरलाही क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
Risk of infection due to contact with the corona patient; As many as 119 quarantine personnel on mangalwedha solapur
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज