टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी निवेदनाद्वारे केली. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना प्रशांत साळे यांनी निवेदन दिले आहे.
विजय वडेट्टीवार यांची विधानभवन मुंबई येथे त्यांनी भेट घेतली. मंगळवेढा तालुका अवर्षणग्रस्त भागात येत असल्यामुळे तालुक्यात नेहमी दुष्काळजन्य परिस्थिती असते.
चालू वर्षी अत्यंत तुरळक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील सर्व जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे तर रब्बी हंगामाच्या पेरण्या ५० टक्के पेक्षा कमी झाल्या आहेत.
अशी परिस्थिती असताना नेमके कोणते निकष लावत मंगळवेढा तालुक्याला दुष्काळ यादीतून
वगळले आहे असा संतप्त सवाल या निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते ना.वडेट्टीवार यांच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी सरकारपुढे उपस्थित केला आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय हत्तुरे, अशोक चेळेकर हे उपस्थित होते.
चालू वर्षी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असता दुष्काळी यादीतून वगळणे हा मंगळवेढा तालुक्यावर मोठा अन्याय आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी या विषयावर चर्चा करून
सोलापूर जिल्हा प्रशासनाला याबद्दल जाब विचारून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार करणार असल्याचे यावेळी निवेदनकर्त्यांना वडेट्टीवार यांनी सांगितले. याशिवाय तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या कार्य अहवालाचेही यावेळी ना. वडेट्टीवार यांनी कौतुक केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज