टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेना तसेच शेकाप पक्ष, मित्र पक्षांसोबत जिल्हातील अनेक नेते यांच्या उपस्थितीत श्रीयश पॅलेस, पंढरपूर येथे दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी १२वा. महाविकास आघाडीची महाराष्ट्रातील पहिली बैठक संपन्न होणार आहे.
सदर दौऱ्यात सकाळी १०:०० वाजता कापसेवाडी, ता.माढा येथे द्राक्ष बागायतदार मेळाव्यास शरद पवार साहेब मार्गदर्शन करतील नतंर हेलिकॉप्टरने १२ वाजता पंढरपूर श्रीयश पॅलेस माहविकास आघाडी बैठक होईल.
१ः३० वाजता पंढरपूरचे नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर यांच्या घरी भोजन, दुपारी २ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर मंदिरात पांडुरंगाचे दर्शन, २ः३० वाजता ट्युलिप हॉस्पिटल लोकार्पण व ३ः३० वाजता हेलिकॉप्टरने परत पुण्याला रवाना असे कार्यक्रमांचे नियोजन असल्याचे राष्ट्रवादीचे नेते, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी माहिती दिली.
मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार व नेत्यांनी पक्ष सोडला. त्या काळात सोलापूर, पंढरपूर जिल्ह्यातून श्री.अभिजीत पाटील यांनी शदर पवार साहेबांना भक्कम पाठिंबा दर्शविला आहे.
श्री.अभिजीत पाटील यांच्या नियोजनाखाली ही बैठक संपन्न होणार आहे. सोलापूर तसेच पंढरपूर, मंगळवेढा कार्यकर्त्यांना शरद पवार काय मंत्र देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दि.२१ ते २६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान श्री.शरदचंद्रजी पवार यांचा महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरा संपन्न होणार आहे. त्यात दि.२३ ऑक्टोबर रोजी होणारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची पहिली बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज