टीम मंगळवेढा टाईम्स ।
मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकार विरोधातील आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. राज्य सरकारने 24 तारखेच्या आत आरक्षण दिलं नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
तसेच 25 ऑक्टोबरपासून गावागावातील मराठा समाज सर्कलवर येऊन साखळी उपोषण करणार आहे. अख्खं गावचं उपोषणाला बसणार आहे, असं सांगतानाच जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही वैधानिक पदावर असलेल्या राजकीय नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन उपोषणाची घोषणा केली. राज्य सरकारने जर 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मी समाजाला न्याय मिळावा म्हणून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे.
मराठा समाजाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं. नाही तर आमच्या गावाची वेसही शिवू देणार नाही. राजकीय नेत्यांना म्हणजे आमदार, खासदार आणि मंत्र्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
गावागावात साखळी उपोषण
25 तारखेपासून सर्व गावातून प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. आम्ही ताकदीने साखळी उपोषण करू. त्यानंतर 28 तारखेपासून त्याचं रुपांतर आमरण उपोषणात होईल. सर्कल निहाय तयारी मराठा समाजाने केली आहे. सर्व गावांनी सर्कलच्या ठिकाणी कायमस्वरुपी बसून उपोषण करायचं आहे, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
कँडल मार्च काढा
प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रचंड संख्येने मराठा समाजाने एकत्र येऊन कँडल मार्च काढायचा आहे. हे शांततेचं आंदोलन असेल. आंदोलन सुरू झाल्यावर ते सरकारला झेपणार नाही. त्यानंतर 25 तारखेला पुढच्या आंदोलनाची दिशा सांगणार आहोत. ती पेलणार नाही. उपोषण सुरू झाल्यावर सांगू. दोन टप्प्यात आंदोलन करू. त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
आंदोलन झेपणार नाही
आमरण उपोषण आणि सर्कलचे साखळी उपोषण ताकदीने सुरू होणार आहे. चार दिवसात तुम्हाला आमचं आंदोलन झेपणार नाही. पण 25 तारखेला 28 तारखेच्या आंदोलनाची दिशा सांगितली जाईल. जी दिशा सांगितली जाईल ती सरकारला पेलणार नाही.
तुमच्यासाठी सोप्पं असेल. पण आंदोलन सुरू झाल्यावर झेपणार नाही. हे शांततेचं युद्ध असेल. ते तुम्हाला झेपणार नाही. ते तुम्हाला पेलणार नाही. त्याची दखल घ्या. 24तारखेच्या आत आरक्षण द्या, असं ते म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज