मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज शनिवार 2 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या

उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल असून आज 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थी बोर्डाच्या संकेतस्थळावर रिझल्ट पाहू शकणार आहेत.

दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील व परिसरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सारा कॉम्प्युटर ऑनलाईन, पंढरपूर अर्बन बँक जवळ, मुरलीधर चौक मंगळवेढा 8623862010 येथे मोफत निकाल पाहता येणार आहे. तसेच निकालाची प्रिंट देखील विद्यार्थ्यांना मोफत दिली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडाळामार्फत बारावीचा निकाल आज ऑनलाइन पद्धतीने जाहिर करण्यात येणार आहे.

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. त्यानंतर विद्यार्थी या माहिती प्रिंटदेखील काढू शकतात. तसंच, डिजीलॉकर अॅपमध्ये डिजीटल रिझल्ट संग्रहीत करुन ठेवण्याची सोयदेखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

या लिंकवर निकाल पाहू शकणार आहात
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. https://hscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
कसा पाहाल निकाल?
– सगळ्यात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
– होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल लिंक दिसेल. त्याला क्लिक करा.
– क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल. त्याठिकाणी सीट नंबर आणि इतर माहिती भरुन ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

5 मे रोजी दहावीचा निकाल?
दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा दर वर्षीपेक्षा यंदा दहा दिवस लवकर सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेसोबतच निकाल देखील लवकर जाहीर केला जाणार आहे.

त्यामुळं साधारणपणे एसएससी बोर्डाचा निकाल हा सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कधीही लागू शकतो. निकाल 10 मे च्या आतच लागणार असल्याचे बोलले जात आहे.
गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबद्दल शंका असेल किंवा गुण कमी वाटत असतील, त्यांच्यासाठी बोर्डाने गुणपडताळणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ३ मे २०२६ ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य आहे.
छायाप्रत मिळाल्यापासून ५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. या अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.
विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रिका काही दिवसांनंतर त्यांच्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून प्राप्त होतील. तसेच ‘Digilocker’ ॲपमध्येही आपली डिजिटल गुणपत्रिका सुरक्षित ठेवण्याची सोय बोर्डाने करून दिली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










