mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 21, 2026
in क्राईम, सोलापूर
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. पतीच्या कथित त्रासाला आणि छळाला कंटाळून एका 26 वर्षीय आईने स्वतःच्या अवघ्या 10 महिन्यांच्या निष्पाप मुलीचा गळा दाबून, त्यानंतर तिला पाण्याच्या बादलीत बुडवून खून केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

ही थरारक घटना बार्शी शहरात घटना बार्शी शहरात घडली असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आउणे केवळ धाकट्या 10 महिन्यांच्या मुलीलाच नव्हे तर, आपल्या 6 वर्षांच्या मोठ्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्या 6 वर्षांच्या निष्पाप बलिकेने आई मी शाळा शिकते, मला मारू नकोस अशी आर्त विनवणी ऐकून आईच मन विरघळले आणि तिने मोठ्या मुलीला सोडले, ज्यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला.

हत्येनंतर मृत चिमूकलीला खांद्यावर घेऊन आई थेट पोलीस ठाण्यात

या हृदयद्रावक हत्येनंतर परिसरात आणखी एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. पोटच्या मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी महिला त्या मृत चिमूरडीला आपल्या खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात हजर झाली.

माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मी मुलीची हत्या केली आहे, मला अटक करा असे पोलिसांना सांगितले. महिलेचे हे बोलणे ऐकून पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारीही सुन्न झाले.

या घटनेनंतर १० महिन्यांच्या ‘शक्ती’ नावाच्या चिमुरडीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेची सविस्तर आणि डोळ्यात पाणी आणणारी माहिती मृत बालिकेची मोठी बहीण तेजल हिने पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणी आरोपी महिला पूजा योगेश खुर्दामळे हिच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून) आणि १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या छळाची पार्श्वभूमी आणि या हत्येमागील नेमके कारण काय, याचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेत राडा! डान्स स्पर्धा पाहताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी गज; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

November 14, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हादरवणारी घटना! मंगळवेढ्यात बेशिस्त ट्रॅक्टर चालकाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार; गुन्हा दाखल

November 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावगाड्यातील इच्छुकांनो, कार्यकर्त्यांना सांभाळा! ग्रामपंचायत निवडणुकांसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा; तीव्र दुष्काळाचा फटका

November 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

​भालकेंच्या बालेकिल्ल्यात राजकीय हालचालींना वेग; सरकोलीसाठी आमदार समाधान आवताडे यांनी केल्या मोठ्या घोषणा; राजकारण तापले

November 13, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

हक्काचा प्लॉट घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! मंगळवेढ्यात ‘वीरश्री बँक’ देणार अवघ्या एका दिवसात कर्ज; आजच व्हा ‘शिवशाही सिटी’त स्वतःच्या प्लॉटचे मालक; 9673635511 संपर्क साधावा

November 12, 2026
मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

November 9, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

November 7, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
Next Post
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता 'स्मार्ट' सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी 'या' ठिकाणी 'तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेत राडा! डान्स स्पर्धा पाहताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी गज; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

November 14, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हादरवणारी घटना! मंगळवेढ्यात बेशिस्त ट्रॅक्टर चालकाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार; गुन्हा दाखल

November 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावगाड्यातील इच्छुकांनो, कार्यकर्त्यांना सांभाळा! ग्रामपंचायत निवडणुकांसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा; तीव्र दुष्काळाचा फटका

November 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

​भालकेंच्या बालेकिल्ल्यात राजकीय हालचालींना वेग; सरकोलीसाठी आमदार समाधान आवताडे यांनी केल्या मोठ्या घोषणा; राजकारण तापले

November 13, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

हक्काचा प्लॉट घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! मंगळवेढ्यात ‘वीरश्री बँक’ देणार अवघ्या एका दिवसात कर्ज; आजच व्हा ‘शिवशाही सिटी’त स्वतःच्या प्लॉटचे मालक; 9673635511 संपर्क साधावा

November 12, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट

November 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..