टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील संत दामाजीनगर येथील सप्तश्रृंगीनगर ते जुना ढवळस रोड येथील रहिवाशांनी रस्त्याची झालेली दुरावस्थेला वैतागून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता जि.प. यांना लक्ष्मण गायकवाड व आण्णा आसबे यांच्यासह २१ लोकांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले.
रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान
सदर निवेदनामध्ये रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे होणारे अपघात हे किती दिवस चालणार.
अनेक वर्षापासून नागरिकांनी पाठपुरावा करूनही शासनाने कोणतीही दखल घेतली नाही सदर रस्ता दि.२१ जानेवारी २०२२ च्या अगोदर डांबरीकरण करण्यास सुरूवात करावी अन्यथा
बेमुदत उपोषणाचा इशारा
आम्ही सह्या करणारे दि.२२ जानेवारी पासून तहसिल कार्यालय मंगळवेढा समोर जो पर्यंत रस्त्याचे काम चालू होणार नाही तो पर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल आहे.
सदरचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पालकमंत्री दत्तात्रय भरणे, उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग, तहसिलदार स्वप्निल रावडे आदिंना पाठवण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज