टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका व मदतनीस यांच्या मानधनात ३३.३३ टक्के वाढ करण्याचा निर्णय प्रायमा संस्थेच्या सर्वसाधारण मिटिंग घेण्यात आला.
प्रायमा संस्थेत बारा शिक्षिका आणि तीन मदतनीस असे एकूण पंधरा कर्मचारी कार्यरत आहेत.
प्रायमा मध्ये शिशु, लहान व मोठा वर्ग असे एकूण तीन वर्ग आहेत. प्रत्येक गटाचे दोन वर्ग असून या प्रत्येक वर्गात दोन शिक्षिका आहेत.
प्रत्येक गटातील शिक्षिका या प्रत्येक मुलां-मुलींना वैयक्तिक लक्ष देवून त्यांना शंभर टक्के घडविण्याचे महान कार्य करत असतात.
मुलांच्यावर शिक्षणासोबत, संस्कारप्रिय विद्यार्थी घडविणे, कृतिशिल विद्यार्थी तयार करण्याचे कार्य करत असतात.
याशिवाय प्रायमा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या नवनवीन संकल्पना राबविल्या जातात त्याची त्वरित अंमलबजावणी पूर्ण करतात. नवनवीन योजनांची माहितीचा अभ्यास करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतात.
प्रायमामधील सर्वच वर्ग खोल्या व प्रांगणातील आणि संपूर्ण परिसरातील स्वच्छता ठेवण्याचे तसेच परिसरातील फुलझाडांची काळजी घेण्याचे कार्य मदतनीस प्रामाणिकपणे पार पाडत असतात.
त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पालकांना, अभ्यंगतांना देखील प्रायमाचा स्वच्छ परिसर पाहून एक मानसिक समाधान वाटते, शिवाय पुन्हा पुन्हा यावे वाटतेच. याचे श्रेय प्रायमामधील मदतनीस यांना जाते.
म्हणजेच प्रत्येक पालकांची व अभ्यंगताची पहिली पसंती ही प्रायमालाच मिळत आहे. याचे श्रेय प्रायमामधील शिक्षिका आणि मदतनीस यांना जाते.
म्हणूनच लॉकडाऊन नंतरच्या वाढलेल्या महागाईचा विचार करुन प्रायमा संस्थेने प्रायमामधील शिक्षिका व मदतनीस यांच्या मुळ मानधनात ३३.३३ टक्के वाढ करण्याचे ठरविले आहे.
सदरची वाढ शैक्षणिक वर्ष जून २०२२ पासून अंमलात आणली जाणार असल्याचे प्रायमाचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार यांनी सांगितले.
सदरच्या मानधनात वाढ केल्यामुळे प्रायमाच्या शिक्षिका व मदतनीस यांनी समाधान व्यक्त केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज