मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करावा, जेणेकरून याचा गरीब गरजू लोकांना फायदा होईल. भुके को अन्न, प्यासे को पाणी याप्रमाणे उद्योजक राहुल ताड यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात एकवेळचे जेवण देण्यात आले.
यावेळी गोपाळपूरचे उपसरपंच विक्रम आसबे, शरदनगरचे उपसरपंच अजित माळी, अशविन बुरले, बबलू आसबे, सागर फुगारे, उद्योजक रोहित ताड, सचिन यादव, राजु आकळे, सुरज फुगारे, अलिफ सुतार, भैय्या होडगे, वसिम इनामदार, सोनु नागने, अभिषेक शिवशरन आदी उपस्थित होते.
गोपाळपूर येथे मातोश्री वृद्धाश्रमातील अबाल वृद्धना भोजन दिल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
यावेळी राहुल ताड म्हणाले, असा उपक्रम प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त राबवला पाहिजे. आज तरुण पिढी वाढदिवस फ्लेक्स बोर्ड, पार्टी अशा पद्धतीने साजरा करते.
आपण माझ्या मित्रांनी जो वाढदिवस साजरा केला, त्याने समजात चांगला संदेश जाईल. उपस्थित सर्व मित्रांचे राहुल ताड यांनी आभार मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज