टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील पाझर तलावात शासनाची परवानगी न घेता व रॉयल्टी न भरता १५ ब्रास मुरुमाची चोरी करून साठा केल्याप्रकरणी एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाला.
नंदेश्वर येथील औदुंबर तुकाराम पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मरवडेचे मंडल अधिकारी चंद्रकांत घाडगे यांनी फिर्याद दिली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नंदेश्वर परिसरात मुरुमाचे अवैधरीत्या उत्खनन करून ठेवल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली.
मंडलाधिकारी चंद्रकांत घाडगे, तळसंगीचे तलाठी उमेश सूर्यवंशी, निंबोणीचे तलाठी बी. डी. कोळी, भाळवणीचे कोतवाल पांडुरंग पडवळे यांना १५ ब्रास मुरूमाचा साठा आढळून आला.
त्याची किंमत १ लाख ५९ हजार इतकी निश्चित करण्यात केली. साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास पोलिस कॉन्स्टेबल बापू पवार करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज