टीम मंगळवेढा टाईम्स ।
सहायक शिक्षणाधिकारी असल्याचे सांगून दक्षिण सोलापुरातील शाळांची तपासणी करणाऱ्या जाकीरा फिरदोस गफ्फार शेख, शाहिद उल्लू खान या दोघांना वळसंग पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्यानंतर पोलिसांनी नांदेड व सोलापूर जिल्हा परिषदेकडून त्या महिलेसंबंधीची माहिती मागविली होती.
पण, ती महिला आमच्याकडे कोणत्याही पदावर कार्यरत नसल्याचा खुलासा दोन्ही जिल्हा परिषदांनी पोलिसांना पाठविल्याने तिच्याकडील ओळखपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भात आता पोलिस सत्यता पडताळून कारवाई करतील.
नांदेडच्या शिक्षण विभागाचे बनावट ओळखपत्र तयार करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची तपासणी करणाऱ्या महिलेकडील ‘महाराष्ट्र शासन’ असा फलक लावलेली चारचाकी वळसंग पोलिसांनी जप्त केली आहे.
दरम्यान, त्या महिलेने बुधवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात येऊन मोठा गोंधळ केला. तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मला, शिक्षण खात्याचे ओळखपत्र बनवून दिले.
शिक्षण खात्यात भरपूर नोकऱ्या आहेत, उमेदवार आणा, असे सांगून त्यांनी पैसे घेण्यास सांगितले. जवळपास ४०० जणांचे २० ते २२ लाख रुपये मी तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला दिल्याचा आरोप देखील त्या महिलेने यावेळी केला.
प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याशी हुज्जत घालत त्या महिलेने गोंधळ घातला. दरम्यान, त्या महिलेचे आरोप बिनबुडाचे असून
त्या महिलेकडील ओळखपत्र बनावट असून तिच्यावर कोणीच विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री.जावीर यांनी बोलताना मुख्याध्यापक व शिक्षकांना केले आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज