mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

माढ्याचा खासदार कोण? धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात 80 हजारांनी जिंकणार; रणजितसिंह निंबाळकरांनाही मोदी करिष्म्यावर विश्वास; एक्झिट पोलमध्ये धाकधूक?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 4, 2024
in सोलापूर
धोक्याची घंटा! सोलापूर, माढा आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही; मोहिते पाटील यांची माहिती; धैर्यशील मोहिते पाटील ‘या’ पक्षातून लढणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

माढा लोकसभेचा खासदार कोण होणार? हे येत्या काही तासातच स्पष्ट होईल. भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये थेट लढत आहे.

एक्झिट पोलमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं सांगितलं गेले. पण भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना विजयाचा विश्वास आहे.

धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर हे मतमोजणीसाठी सोलापूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही आहेत.

माढा लोकसभेसाठी भाजपने दुसऱ्यांदा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील यांनी बंडखोरी केल्याने माढा लोकसभेची खूप चर्चा झाली.

मात्र गेल्या पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांनी केलेली कामे, जारंगे यांच्या आंदोलनामुळे अनपेक्षित मिळणारी ओबीसी मते यामुळे निवडणूक खूप चुरशीची झाली.

फलटण, माण खटाव , सांगोला या भागातून मिळणारे मताधिक्य ही जमेची बाजू असून माढा व करमाळा या दोन तालुक्यातून भाजपाच्या जोडीला अजितदादा गटाचे आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांनीही ताकद पणाला लावल्याने या दोन मतदारसंघात देखील चांगले मताधिक्य मिळण्याची आशा निंबाळकर यांना आहे.

मोहिते पाटील व उत्तम जानकर एकत्र आल्याने माळशिरस तालुक्याचे मताधिक्य कमी करण्यावर निंबाळकर व भाजपने प्रयत्न केले होते. एक्झिट पोलमध्ये पराभूत दाखवत असलेल्या निंबाळकर यांना मोदी करिष्म्यावर आशा आहे.

धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले ?

मला सुरुवातीपासूनच विजयाचा विश्वास होता त्यामुळे आज कोणताही ताण तणाव नाही. त्यात जनतेने शरद पवार व विजयदादा यांच्या बाजूने कौल दिल्याने मी 35 ते 80 हजाराच्या फरकाने विजयी होणार.

सर्व एक्झिट पोलने मीच विजयी होणार हे दाखवले आहे. समोरच्या उमेदवाराने मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन केल्याने थोडे मताधिक्य कमी झाले एवढेच. राज्यात आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील, असे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.

रणजित निंबाळकर काय म्हणाले ?

एक्झिट पोल काही दाखवत असले तरी गेल्यावेळीपेक्षा जास्त मताने विजयी होण्याचा दावा रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. आपण दुष्काळी भागासाठी केलेली पाण्याची कामे असोत किंवा मतदारसंघासाठी हायवे, रेल्वेची कामे असोत जनतेने आपल्याला भरभरून मतदान केल्याने गुलाल आमचाच असेल असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केलाय.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी पहाटे देवाचे दर्शन घेवून मतमोजणी केंद्राकडे निघाले

माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्या धैर्यशील यांना पक्षाने तिकीट नाकारले व विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना तिकीट दिले होते. यानंतर भाजपला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करीत हाती तुतारी घेत ही निवडणूक लढवली.  अतिशय अटीतटीची झालेली ही निवडणूक राज्यात जास्त चर्चेत राहिली होती. (स्रोत:ABP माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धैर्यशील मोहिते पाटीलनिंबाळकर

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! ​रात्री सर्वांसोबत जेवण, सकाळी खोलीत आढळला मृतदेह; लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी नेमकं काय घडलं?

October 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! २७ ऑक्टोबरला शाळा-अंगणवाड्यांत मिळणार मोफत ‘या’ गोळ्या; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

October 24, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सक्तीने कर्जवसुली कराल तर खबरदार..! मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट कारवाईचा इशारा; शेतकऱ्यांशी २४ तास संवाद : टँकर, चाऱ्यासह सर्वांची व्यवस्था होणार

October 20, 2026

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 21, 2026
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 19, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
Next Post
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

खबरदार! व्हॉट्सॲप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट पडली तर सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून कारवाई; पोलिसांचा ग्रूप ॲडमिनला इशारा

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! ​आधी सोन्याचा खरा मणी दिला, मग मंगळवेढ्यात बोलावून २ लाखांना घातला गंडा; भामट्यांची नवी शक्कल उघड

October 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

३९ गावांच्या पाण्याचा जीव टांगणीला लावणारा प्रश्न एका झटक्यात निकालात; आमदार समाधान आवताडेंचा ‘तो’ मास्टरस्ट्रोक नेमका काय?

October 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! ​रात्री सर्वांसोबत जेवण, सकाळी खोलीत आढळला मृतदेह; लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी नेमकं काय घडलं?

October 26, 2026
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, नदीत तस्करांची मनमानी! मंगळवेढ्यात भीमा पात्रातून रातोरात कोट्यवधींची वाळू लंपास; दिवसा शांतता, रात्री थेट दरोडा, कसा चालतोय हा खेळ?

October 26, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास; दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली, फायनान्स कंपनीचा संचालक व कर्मचारी फरार

October 25, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

आनंदाची बातमी! अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार; एका बाजूला उन्हाचा पारा वाढला, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

October 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा