मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाची लागण झाल्यानंतर अधिक चर्चेत आलेली बॉलीवूड गायिका कनिका कपूर अखेर कोरोनामुक्त झाली आहे.
तिचा सहावा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे . कोरोनाची लागण झाल्यानंतरसुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे यापूर्वीच तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या कनिकाला आता पोलीस चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे . लखनौमधील संजय गांधी पीजीआय रुग्णालयात कनिका कपूरवर उपचार सुरू होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज