मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले व नगरसेवक प्रवीण खवतोडे यांनी अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.
मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मोठा गट अस्तित्वात होता. निवडणुकीपूर्वीच शहरातील राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा,स्थायी समितीचे सदस्य व नगरसेवक अजित जगताप,जिल्हा युवकचे अध्यक्ष रामेश्वर मासाळ राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सोमनाथ माळी, आदींनी पक्ष सोडून आवताडे व परिचारक गटात प्रवेश केला आहे.
त्यामुळे आमदार भारत भालके यांच्या अडचणीत वाढ झालेले आहे. तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला अनेकांनी रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात तर काहीजण अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या गटात गेल्यामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था फार बिकट झाली आहे.
दोन दिवसावर विधानसभेची निवडणूकीचे मतदान असताना आमदार भारत भालके यांच्या समर्थकांनी त्यांना सोडचिठ्ठी दिल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने व आवताडे यांनी दोन कारखान्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार दिला आहे.त्याच्या कामामुळे आवताडे गटाला पाठिंबा देत असल्याचे नगरसेवक प्रवीण खवतोडे यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज