मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे रात्री १० च्या सुमारास तुकाराम सोमा चौगुले वय.६० व त्याच्या पुतण्या सोमा दगडू चौगुले वय ४५ व नऊ शेळ्या यांना शॉक लागून जागीच मयत झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल दुपार पासून रिमझिम पाऊस सुरू होता. तुकाराम चौगुले यांचे शेळ्यांचा गोटा असून या गोट्याला लोखंडाची व शेड आहे.
या शेड मध्ये त्यांनी अधिकृत स्वतःच्या घरा बाहेरील लाईट बोर्डातून शेळ्यांच्या गोटात लाईटची व्यवस्था केली होती. मात्र अचानक रात्री १० च्या सुमारास बंदिस्त जाळी व पत्र्याच्या शेड मध्ये असलेल्या शेळ्या ओरडू लागल्याने तुकाराम सोमा चौगुले हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना ही जोरदार विजेचा धक्का बसला यावेळी घरातील अनेक माणसांनी आरडाओरडा सुरू केली.
यावेळी शेजारीच राहत असलेला पुतण्या सोमा चौगुले हा झोपत असताना चुलता तुकाराम चौगुले यांना काय झाले आहे पाहण्यासाठी गेले असता त्यांनी चुलता तुकाराम चौगुले यांना गोट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र सोमा चौगुले झोपित होता.त्यालाही विजेचा धक्का बसून तो मयत झाला.
यावेळी तुकाराम चौगुले यांचा मुलगा दत्तात्रय यांनी लाईटचे कनेक्शन बंद केले.यामुळे मोठी टळली.यावेळी विद्युत महावितरणचे अधिकारी संजय शिंदे,उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील,पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
ऐन दीपावलीच्या तोंडावर अशी दुखत घटना घडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज