mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

युटोपियन शुगर्स ची हार्वेस्टिंग क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगिरी.

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
युटोपियन शुगर्स ची हार्वेस्टिंग क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगिरी.

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाची कमतरता निर्माण झाल्याने साखर कारखान्यांना विविध आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक साखर कारखाने असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात केवळ ५ ते ६ कारखाने पूर्ण क्षमतेने चालत आहेत तर काही कारखाने कमी क्षमतेने व उर्वरित साखर कारखाने बंद स्थितीत आहेत.

ऊसाच्या कमतरते बरोबरच जिल्ह्यात ऊस तोडणी यंत्रणेची कमतरता ही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नेहमीच नाविण्याचा शोध घेत अनोखी यंत्रणा उभारणी मध्ये अग्रेसर असणार्‍या  युटोपियन शुगर्स या कारखान्याने मात्र या वरती पर्याय शोधून काढला असल्याची माहिती कारखान्याचे अभ्यासू व कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी दिली .

     नविन तंत्रज्ञाना विषयी माहिती देताना पाटील म्हणाले की, ऊसतोड कामगारांची कमतरता सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच ज्या कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे असे कारखाने हार्वेस्टिंग मशीन चा वापर करीत आहेत. मात्र हार्वेस्टिंग मशीन वापरणे व हार्वेस्टिंग मशीन च्या सहाय्याने तोडणी केलेला ऊस गव्हाणी मध्ये खाली करणे यासाठी टेपलरचा वापर करतात. या साठी आनुषंगिक खर्च ५० लाख रुपया पर्यन्त येतो. व एक वाहन खाली करण्यासाठी साधारणपणे अर्धा तास ईतका कालावधी लागतो.तसेच मेंटेनन्स खर्च ही जास्तीचा येतो. यावर पर्याय काढण्यासाठी युटोपियन शुगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे,  ॲग्रोटेक सेल्स चे श्री अनिल पाटील हे सर्वजण अभ्यास करीत होते. व या सर्वांच्या अभ्यासातून नायलॉन जाळीचा वापर करून ऊस खाली करण्यास सुरुवात केली.या करिता येणारा खर्च ही खूप नगण्य आहे.व कारखान्याला त्यांच्याकडे असणार्‍या प्रचलित यंत्रणेमध्ये कोणताही बदल करावा लागत नाही.तसेच इतर वाहनांप्रमाणेच वेळेत वाहन खाली होत आहे.कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा कारखान्यावर न पडता हा पर्याय निघाला आहे. यासाठी ट्रॅक्टर ,डंपिंग ची ही आवश्यकता नाही. तसेच नायलॉन जाळी बाबत ५ ते १० वर्षाची खात्री मिळाली आहे. या नाविण्यपूर्ण संकल्पनेमुळे कमीत कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे वाहन मालकांचा ही वेळ वाचत असल्यामुळे त्यांनीही या बाबत समाधान व्यक्त केले आहे.

अशा प्रकारचा प्रयोग करणारा युटोपियन शुगर्स हा जिल्ह्यातील पहिलाच साखर कारखाना असून या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी परिसरातील इतर कारखान्याचे अधिकारी भेट घेत असल्याची माहिती कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी दिली.    

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यातील तरुणाची प्रेमसंबंधातून आत्महत्या पोलीस तपासात माहिती उघड

मंगळवेढ्यातील तरुणाची प्रेमसंबंधातून आत्महत्या पोलीस तपासात माहिती उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे नशीब बदलणारा २६ नोव्हेंबरचा निर्णय; २४ तास आधीच ‘हे’ दोन आयडी तयार ठेवा; आमदार समाधान आवताडे यांनी केले जनतेला आवाहन

November 20, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

दुष्काळाचे भान, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर,सर्वधर्मीय सामुदायिक विवाह अन् लेकीच्या जन्माचे स्वागत; आ.समाधान आवताडे यांचा वाढदिवस ठरणार ‘लोकचळवळ’

November 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अलर्ट! चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं हवामान बदलणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

November 20, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोघांचा ‘स्टिअरिंग’वरील ताबा सुटण्यापूर्वीच पोलिसांचा दणका; मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई; चालकांवर गुन्हे दाखल

November 20, 2026

महाराष्ट्रात नवे वेतन नियम लागू! आता ‘इतके’ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम अन् सुट्टीच्या दिवशी काम केल्यास थेट दुप्पट पैसे मिळणार

November 19, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा