मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । तू आमच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतो का , असे म्हणून एकास घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी ११ जणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . ही घटना ५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली . बाबासाहेब रामचंद्र कांबळे , पाप्या ऊर्फ मारुती रामचंद्र कांबळे , संतोष रामचंद्र कांबळे ,अक्षय उद्धव कांबळे , अर्जुन महादेव कांबळे , चंदू महादेव कांबळे , लखन महादेव कांबळे , आकाश अभिमन्यू गायकवाड ,राणी संतोष कांबळे , कोमल मारुती कांबळे , प्रिया बाबासाहेब कांबळे ( सर्व रा . गांधी नगर भाग ३) अशी त्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सिद्धार्थ इरप्पा तुपसाखरे ( वय ४४ , रा . गांधी नगर झोपडपट्टी , अक्कलकोट रोड ) यांनी फिर्याद दिली आहे . सिद्धार्थ यांच्या गल्लीतील दुकानात त्यांचा भाच्चा पाणी आणण्यासाठी गेला होता . तेव्हा पाप्या कांबळे याने त्यास विनाकारण मारहाण केली होती.त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पाप्या कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता . त्याचा राग मनात धरुन सिद्धार्थ यांच्या घरात घुसून ‘ तू आमच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करतो का ‘ असे म्हणून शिवीगाळ केली.
तसेच भाच्च्याच्या डोक्यात फरशी घालून त्यास जखमी करण्यात आले आहे . तसेच सिद्धार्थ यांची पत्नी , आई , बहीण यांना देखील शिवीगाळ केली व घरावर दगडफेक करून तुम्हाला गल्लीत राहू देणार नाही , अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज