वडील व सावत्र आईस पाच दिवसांचा पोलीस कोठडी..!
मंगळवेढा/समाधान फुगारे
खोट्या प्रतिष्ठेमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनुराधा बिराजदार या तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे . आपल्या शेतात सालगडी म्हणुन काम करणाऱ्या गड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याच्या कारणातुन आईविना वाढलेल्या या गोड मुलीची हत्या तीचे वडील आणि सावत्र आईने केल्याची तक्रार मामाने केल्यानंतर या दोघानाही अटक करण्यात आली आहे .
#जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
आईच्या मृत्युनंतर अनुराधा हि आपल्या मामाच्या गावात राहून शिक्षण घेत होती . मात्र दहावी नंतरच्या शिक्षणाची सोय मामाच्या बोराळे या गावात नसल्याने ती पुढील शिक्षणासाठी पुन्हा वडिलांकडे सलगर येथे आली होती .बारावीला चांगले मार्क मिळाल्याने तीला कर्नाटकमधील सिंदगी येथे बीएएमएस ला प्रवेश मिळाला .यंदा ती शेवटच्या वर्षात शिकत होती.
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
याच काळात तीचे प्रेम शेतातील गड्याच्या मुलावर बसल्याने त्यानी १ ओक्टोबर रोजी विवाह केल्याचे बोलले जात होते . याची माहिती वडिलाना समजताच त्यानी अनुराधा हिला सिंदगी येथुन २ ऑक्टोबर रोजी आणुन मामाकडे सोडले होते . यावेळी त्यांनी प्रेमविवाह केल्याबद्दल सांगितलें होते . यानंतर ४ ऑक्टोबर रोजी कॉलेजच्या परिक्षेचे कारण सांगुन वडील तीला घेवुन गेले . आणि पाच तारखेच्या पहाटे अनुराधाचा मृत्युची बातमी मामाला कळविण्यात आली . मात्र लगेचच अंत्यसंस्कार केल्याचे समजल्यावर मामाला संशय आला . याचवेळी मामाच्या घरी झाडताना आज्जीला अनुराधा हिने लिहिलेली चिठ्ठी सापडली . यात तिने आपल्याला खुप मानसिक त्रास असुन शिकुन आपल्या पायावर उभे रहायची इछा व्यक्त केली होती . आपण कितीही त्रास झाला तरी आत्महत्या करणार नसुन आपल्या जिवाला धोका असल्याचे लिहिले होते .
यानंतर मामाने पोलीसात तक्रार दिल्यावर अनुराधाचे वडिल विठ्ठल आणि सावत्र आई श्रीदेवी बिराजदार यांना पोलिसानी अटक केली आहे . आता अनुराधा हिचा तो पती कोण याचा पोलीसांनी शोध सुरु केला आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज