मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात व इतर जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्ह्यात फरारी असलेला आरोपी रविंद्र ऊर्फ पपुल्या रामा काळे याला तामदर्डी येथून शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय आवताडे हे विविध गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना आरोपी १) रविंद्र ऊर्फ पपुल्या रामा काळे व २) अमोल उर्फ सौदागर शरणाप्पा भोसले (पारधी वस्ती ,तामदर्डी ता.मंगळवेढा) वरील १ आरोपींनी माझ्या अंगावर कुऱ्हाड घेऊन येऊन हातावर मारीत असताना उजव्या हाताच्या बोटावर जखम झालेली असून शासकीय कामात व पोलिसांवर कुऱ्हाडीचा धाक दाखवत दहशत निर्माण केली म्हणून धनंजय आवताडे यांनी फिर्याद दिली आहे.
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी खांडेकर साहेब, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि बिराजदार, संदीप धांडे, गुन्हे शाखेचे पोलीस काझी यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.
सदर आरोपी वर अनेक प्रकारचे यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने या आरोपी वर पोलिसांचा माग होता रवींद्र काळे यांनी खून दरोडे मारामाऱ्या वाळू चोरीप्रकरणी मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावर असल्याने तो फरारी होता दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास सदर आरोपी त्या ठिकाणी आल्याचे समजताच त्याच्या शोधार्थ यंत्रणा कामाला लागली आणि पहाटेच्या सुमारास रवींद्र काळे हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज