मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । विजापूर रस्त्यावरील रामलिंग नगरात राहणाऱ्या इंजिनिअरला धमकी दिल्याबद्दल तिघांविरुद्ध | विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत रामलिंगप्पा अशोक चिंचोळकर (वय.४६) या इंजिनिअरने दिलेल्या फिर्यादीवरून नंदा सचिन भंडारे (रा.भैरू वस्ती), सचिनचा भाऊ व आणखी एक अनोळखी महिला अशा तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे . फिर्यादीने तीन दिवसांपूर्वी केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या घरात घुसून फिर्यादीच्या जागेवर कब्जा करतो , तुला बघून घेतो माझ्याशी गाठ आहे , अशी धमकी देऊन शिवीगाळ केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज