mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोलीस ठाण्याच्या लॉक अपमध्येच आरोपीचा गळफास घेण्याचा प्रयत्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पोलीस ठाण्याच्या लॉक अपमध्येच आरोपीचा गळफास घेण्याचा प्रयत्न



(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-)

जमीन मालकाकडून पॅन कार्ड , आधार कार्ड व फोटो असे व्हॉट्स अॅपवर मागवून मालकाऐवजी तोतया इसम उभा करून ४ लाख रुपयांची २० आर जमीन परस्पर खरेदी केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या सीताराम लक्ष्मण मेटकरी या आरोपीने सांगोला पोलीस ठाण्याच्या लॉक अपमध्येच आपल्या शर्टाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 



ही घटना रविवार , १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ . ३० वाजण्याच्या सुमारास सांगोला पोलीस ठाण्यात घडली . चार जानेवारी रोजी जमीन मालकाऐवजी तोतया इसम उभा करून जमिनीची परस्पर खरेदी करणाऱ्या सीताराम मेटकरी याच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 



सदर गुन्ह्यातील आरोपी मेटकरी यास सांगोला पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यातील लॉक अपमध्ये ठेवले होते. 



दरम्यान , पोलीस ठाण्यात उपस्थित असणारे अधिकारी – कर्मचारी आपल्या कक्षात आणि कामात व्यस्त असताना पोलीस ठाण्याच्या लॉक अपमध्ये असणाऱ्या सीताराम मेटकरी याने आपल्या अंगातील शर्ट काढून तो लॉकअपच्या गजाला वरील बाजूस घट्टबांधून याच शर्टाच्या सहाय्याने स्वतःला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. 



याचवेळी पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनी हा प्रकार पाहून येथील ठाणे अंमलदार व इतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांनी मेटकरी याने लावून घेतलेला गळफास काढून त्याला असे कृत्य करण्यापासून रोखले. परंतु सदर गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष दिले नसते तर हा प्रकार आरोपी सीताराम लक्ष्मण मेटकरी याच्या जीवावर बेतू शकला असता. मेटकरी याने असा प्रयत्न का केला ? खरोखर त्याला आत्महत्या करायची होती, की तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी त्याने हे कृत्य केले, याबाबत चर्चा सुरू होती.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeLatest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सातारा जिल्ह्यात ट्रक मोटारसायकलच्या अपघातात दोघे ठार

सातारा जिल्ह्यात ट्रक मोटारसायकलच्या अपघातात दोघे ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा