मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथे देवराज सुखदेव ढगे (वय.३२)या ऊस तोड कामगाराने अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, निंबोनी गावामधील देवराज ढगे हा युवक आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ऊस तोडीसाठी जात होता.मात्र शुक्रवारी रात्री त्याने आपले जीवन संपवले आपल्या राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. दरम्यान पत्नी माहेरी गेली असल्याने घरी कोणी नसताना त्याने आपले जीवन संपवले त्याला दोन मुले आहेत.
पोलिस हवालदार शहानुर फकीर,बालाजी रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दक्षिण भागात दुष्काळाची मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने या भागातील मजुरांना रोजगार साधन नसल्यामुळे ऊसतोडणी शिवाय पर्याय नाही. उसतोडणीसाठी मजुराला देण्यात येणारी उचल आणि प्रत्यक्ष कामावर येण्याच्या मजुराची मानसिकता यात मुकादम व मजुर यांच्यात बऱ्याचवेळा वादाचे व फसवणूकीचे प्रकार होत असतात.
दुष्काळी तालुक्यातील निंबोणी या गावातील अनेक युवक ऊस तोडीसाठी साठी जात आहेत मात्र या गावातच ऊसतोड कामगाराची दुसरी आत्महत्या घडली आहे काही दिवसांपूर्वीच सोमलिंग नामदेव देवकते या युवकाने गळफास घेतला होता.या घटनेला महिनाभर उलटला नाही तोपर्यंत त्याच गावात हा आत्महत्या चा प्रकार घडला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज