मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील इंदिरानगर मधील नागरिक रात्री-अपरात्री घरावर दगड पडण्याच्या विचित्र प्रकारामुळे भयभीत झाले आहेत. नंदेश्वर गावालगतच गोणेवाडी-नंदेश्वर रस्त्यालगत इंदिरानगर आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून रात्री-अपरात्री इंदिरानगर मधील काही घरांवर दगडे पडण्याचा विचित्र प्रकार होत आहे. यामुळे इंदिरानगर मधील महिला व लहान मुले भयभीत झाले आहेत.
यासंबंधी गावातील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात रात्री गस्त वाढविण्यासाठी व या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तक्रारी अर्ज दिला आहे. तसेच ग्रामपंचायतीनेही पोलीस ठाण्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे. तक्रारी अर्ज देऊन जवळपास दहा दिवस उलटून गेले तरीही पोलिसांकडून कसलीही कारवाई केली गेली नसल्याने नंदेश्वर ग्रामस्थांनी अतिशय संताप व्यक्त केला आहे.
नंदेश्वर येथे पोलीस पोस्ट असल्याने येथे साधारणपणे तीन ते चार पोलिस कर्मचारी वास्तव्यास असणे गरजेचे असूनही येथे एकही कर्मचारी वास्तव्यास राहत नाही. यासंबंधी पोलिसांनी लवकरात लवकर गस्त घालून कारवाई न केल्यास इंदिरानगर मधील नागरिक भागाचे ग्रामपंचायत सदस्य यांनी मंगळवेढा येथील पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
आम्ही पोलिसांकडे तक्रार करून जवळपास दहा दिवस उलटले आहेत. इंदिरानगरमधील आम्ही सर्व तरुण रात्री गस्त घालत आहोत. पण तरीही दगडे पडण्याचा प्रकार वारंवार घडतच आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त घालून या प्रकाराची चौकशी करावी.-मल्हारी कांबळे, नंदेश्वर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज