mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भालकेंच्या घरातच उमेदवारी की नव्या चेहऱ्याला संधी? उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील उद्या पंढरपूर दौऱ्यावर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 20, 2021
in सोलापूर
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता कमालीचा वेग आला असून कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण आमदार होणार याची उत्सुकता वाढली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. आपली पकड मजबूत ठेवणारे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पक्षांमध्ये आणि विठ्ठल परिवारामध्ये अंतर्गत कलह वाढला आहे.

काही पदाधिकाऱ्यांनी थेट भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने हा वाद मिटवण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत.

रविवार 21 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता श्रेयस पॅलेस, कराड रोड पंढरपूर येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

या पोटनिवडणुकीत आता राष्ट्रवादीकडून कुणाला तिकीट दिलं जाणार आणि भाजपकडून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकींनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्ण बदलली आहे.राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्व आहे.

पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी उघड

आ.भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची धुरा त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या खांद्यावर आली. भगीरथ भालके चेअरमन झाल्याचे अनेक संचालकांच्या पचणी पडले नव्हते. त्यामुळे अंतर्गत खदखद सुरू होती. याची ठिणगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांच्या निवडीवरून पडली.

युवराज पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि थेट भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला आव्हान दिले. याला विठ्ठलाच्या काही संचालकांची आतून फूस असल्याचे देखील बोलले जात आहे.

युवराज पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या बंडाची दखल थेट पक्षाने घेतली.पोटनिवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत कलह वाढल्यास धोका होऊ शकतो. त्यामुळे भगीरथ भालके यांच्या जागी आमदार भारत भालके यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई भालके यांना उमेदवारी देण्याबाबत देखील चर्चा सुरू झाली. तरीही खबरदारी म्हणून रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. अंतर्गत वाद मिटवून त्यानंतरच उमेदवारीची घोषणा केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

भालके कुटुंबाला डावलणे कठीण

एकंदरीतच पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा अंतर्गत वाद मिटवणे आणि कार्यकर्त्यांना कामाला लावणे यासाठी हे दोन बडे नेते पंढरपूरात येत आहेत.

भारत भालके यांनी 2009 , 2014 आणि 2019 अशी सलग विजयाची हॅट्रिक साधली होती. प्रत्येक वेळेस त्यांनी एक हाती विजय खेचून आणला होता. आता मात्र अंतर्गत कलह वाढल्याने आणि सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीमध्ये खंबीर नेतृत्व नसल्याने थेट प्रदेश पातळीवरील नेत्यांना पोटनिवडणुकीमध्ये लक्ष घालावे लागत आहे.

आता उमेदवारी देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना भालके यांच्या प्रतिमेचा विचार करावाच लागणार आहे. भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता सध्या वर्तविली जात आहे.

भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी केली.

पक्ष निरीक्षकांनी घेतलेल्या बैठकीत देखील भगिरथ यांचेच एकमेव नाव पुढे आले. तथापी निवडणूकीसाठी इच्छुक असलेले डीव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन श्री. पवार यांची भेट घेतली होती.

दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी देण्याविषयी विचारणा होत असल्याचे जाहीरपणे केले आहे.

परंतु कोणत्याही पक्षाने अजून उमेदवारीची घोषणा केलेली नाही. शिवसेनेच्या शैला गोडसे हे देखील निवडणूकीसाठी इच्छुक आहेत.

परिचारक गटाची भूमिका निर्णायक

राजकीय हालचालींना वेग आलेला असताना परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेची मूदत आणखी साधारण एक वर्ष आहे. त्यामुळे युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक अथवा युवा नेते प्रणव परिचारक यांना रिंगणात उतरवावे, असा सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

परंतु आमदार प्रशांत परिचारक यांनी अजून नेमकी भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे यावेळी परिचारक कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार का भाजप जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पण परिचारक गट सध्या पोटनिवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं बोललं जात आहे.

भाजपाकडून आवताडे यांचे नाव आघाडीवर

भाजपाकडून कोणाला उमेदवारी द्यायची, या विषयी चाचपणी सुरु आहे. मात्र भाजपकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान औताडे यांचे नाव सध्या तरी आघाडीवर आहे.

बांधकाम ठेकेदार म्हणून समाधान आवताडे हे देखील भाजपा नेत्यांच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या किंवा आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह दिला जाऊ शकतो.

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थीतीमुळे या पोटनिवडणुकीला खास महत्व आहे. शिवाय या मतदारसंघात आता महाआघाडीमुळे शिवसेनेच्या अस्तिताचे काय होणार हाही प्रश्न आहे. तसेच विविध पक्षांतून अनेक मातब्बर इच्छुक असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अंतर्गतगटबाजीपंढरपूरराष्ट्रवादी

संबंधित बातम्या

बँक मॅनेजरच्या नावाचा वापर करत साडेपाच कोटींच्या कर्जाचे आमिष; नोकरदाराला १० लाखांचा गंडा; दाम्पत्यासह ‘या’ बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा

November 24, 2026
दुष्काळाचे चटके तीव्र! मंगळवेढ्यात चारा, पाणी आणि रोजगारासाठी अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव; कागदोपत्री आढावे नकोत, थेट बांधावर मदत द्या

दुष्काळाचे चटके तीव्र! मंगळवेढ्यात चारा, पाणी आणि रोजगारासाठी अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव; कागदोपत्री आढावे नकोत, थेट बांधावर मदत द्या

November 22, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

स्वीकृत सदस्य निवडीचा बिगुल वाजला!सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत वाढणार ‘एवढे’ स्वीकृत सदस्य; पाहा कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?

November 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे नशीब बदलणारा २६ नोव्हेंबरचा निर्णय; २४ तास आधीच ‘हे’ दोन आयडी तयार ठेवा; आमदार समाधान आवताडे यांनी केले जनतेला आवाहन

November 21, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! ‘या’ आठ जागांचा फैसला मुख्यमंत्री करणार; बैठकीत निर्णय, आज अंतिम यादी राजन पाटील वाचणार

November 17, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावगाड्यातील इच्छुकांनो, कार्यकर्त्यांना सांभाळा! ग्रामपंचायत निवडणुकांसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा; तीव्र दुष्काळाचा फटका

November 14, 2026
Next Post
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांना दिलासा! दहावी-बारावीची परीक्षा 'या' पद्धतीनेच होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 25, 2026
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

November 24, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! तीन वर्ष जमीन कसली नाही तर सरकारकडे जाणार? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला मोठा खुलासा

November 25, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

भाड्याच्या घरातून व्हा मुक्त! मंगळवेढ्यात घ्या स्वतःचा हक्काचा प्लॉट; मेन डांबरी रोडटच ‘शिवशाही सिटी’मध्ये प्लॉट खरेदी करा; मिळवा १ लाख रुपयांची विशेष सवलत; अधिक माहितीसाठी 9890605962 संपर्क साधा

November 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा