टीम मंगळवेढा टाईम्स। अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी अकबर उर्फ टिपू अमीर शेख याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. अकबर शेख ६ मार्चपासून तुरुंगात आहे. आपल्या वस्तीतच राहणाऱ्या पिडीत मुलाला अकबर याने त्याच्या घरी कोणी नसल्याचे पाहून दुपारी २ च्या सुमारास दुकानातून दूध आणण्याच्या बहाण्याने बोलावले.दूध आणल्यानंतर खाऊ देण्याचे अमिष दाखवून त्याने त्यास घरात घेवून अत्याचार केला.
याबाबतची माहिती कोणास सांगू नको,अशी धमकी दिली. पिडीत मुलाला रात्री त्रास झाल्यानंतर त्याच्या आई वडीलांनी केलेल्या चौकशीत अकबरचा गुन्हा उघडकीस आला.
याबाबत पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अकबर विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. वैद्यकीय अहवाल अकबरच्या गैरकृत्याची पुष्टी करत आहे . आरोपी अंमली पदार्थाची नशा करतो. नशेत छेडछाड करतो हे तपासात समोर आले आहे. पिडीत अवघ्या ११ वर्षाचा आहे. हे लक्षात घेवून सत्र न्यायालयाने अकबर शेख याला जामीन देणे उचित होणार नाही असा निष्कर्ष काढून अर्ज फेटाळला.
Barshit denied bail to accused in unnatural atrocities case
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज