mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक । औरंगाबादमधील ‘त्या’ हत्याकांडालात नवी माहीती उघड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
धक्कादायक । औरंगाबादमधील ‘त्या’ हत्याकांडालात नवी माहीती उघड

टीम मंगळवेढा टाईम्स । औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात बहिण आणि भावाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार पथक तैनात केली आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून किरण खंदाडे आणि सौरभ खंदाडे या दोन्ही बहीण भावाची हत्या करण्यात आली व त्यानंतर घरातील सुमारे एक किलोपेक्षा अधिक सोने लंपास करण्यात आले असल्याची बाब आता समोर आली आहे. हे प्रकरण ब्लाइंड मर्डर असून चार पथके तैनात करण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात यश येईल, असा विश्वास पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी व्यक्त केला.

शहरातील सातारा परिसर भागात राहणाऱ्या राजपूत कुटुंबातील 18 वर्षीय किरण आणि 16 वर्षीय सौरभ या दोन्ही भाऊ बहिणीची 9 जून रोजी रात्री गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या नंतर घरातील सुमारे एक किलो पेक्षा अधिक सोने लंपास झाले आहे. पोलिसांनी या ब्लाइंड मर्डर चा तपास सुरू केला आहे.

मारेकरी हे ओळखीचे असावे?

आज सकाळी फॉरेन्सिक टीमच्या पथकाने घरातील सर्व साहित्याची पाहणी केली. त्याच बरोबर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. घरात दरवाजा, खिडकी आशा कुठल्याही वस्तू तोडलेल्या नव्हत्या. त्यामुळे मारेकरी हे मयताचे ओळखीचे असल्याची शक्यता आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करीत आहेत.

घराच्या कंपाउंडमध्ये सापडला एका रुमाल

घरातील कंपाउंडच्या आतमध्ये एक रुमाल श्वान पथकाला सापडला. या रुमालामध्ये 100 रुपयांची एक नोट आणि बांगडी देखील सापडली आहे. नेमकी कोणत्या कारणाने हे दुहेरीकांड घडले या निष्कर्षांपर्यंत अजून पोलीस पोहोचलेले नाही. शवविच्छेदन अहवाल व मृताच्या मोबाईल रेकॉर्ड नंतर काही धागेदोरे हातात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘ही पूर्णपणे ब्लाइंड मर्डर केस आहे. पोलिसांकडून विविध दिशेनं तपास सुरू असून गुन्ह्यात वापरलेले हत्यार मिळालेले नाही, हत्येनंतर मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत. सर्व अंगाचा विचार करून तपास सुरू असून लवकरच आरोपी अटक करण्यात यश येईल’, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

Aurangabad sister-brother murder a new twist

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
माढ्यात टिपरची धडक ; तरुणाचा मृत्यू

माढ्यात टिपरची धडक ; तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा