टीम मंगळवेढा टाईम्स।
फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण करून युवतीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी सुधीर राजेंद्र कोकरे (रा.ब्रम्हपुरी ता.मंगळवेढा ) यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सी . व्ही . भडंग यांनी जामीन मंजूर केला.
यात हकिकत अशी की, फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून ओळख निर्माण करून प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवतीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून सुधीर कोकरे यास अटक झाली होती.
या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून सुधीर कोकरे याने पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस युवतीवर दुष्कर्म केल्याबाबतचा कोणताही सकृतदर्शनी पुरावा नसल्याचा युक्तीवाद मांडण्यात आला.
तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.यात आरोपीतर्फे अॅड . रितेश थोबडे , अॅड सारंग काकडे , अॅड.शिवाजी घुले यांनी तर सरकारतर्फे अॅड .जे. एस. लोहकरे यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज