mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मला संधी दया, विकास काय आहे हे दाखवून मतदारसंघाचे चित्र बदलून दाखवतो; सिध्देश्वर आवताडे यांची ग्वाही

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 13, 2021
in मंगळवेढा, राजकारण
सिध्देश्वर आवताडे यांच्या गावभेटी दौऱ्यास आजपासून सुरुवात

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मी कुठल्या पक्षाशी अथवा कुठल्या नेत्याशी बांधील नसून सहकाररत्न बबनराव आवताडे हेच माझे आदर्श असून त्यांनी गेल्या ४० वर्षात केलेल्या राजकीय व सहकार क्षेत्रातील कार्याची शिदोरी आपल्या पाठीशी असून या शिदोरीच्या आधारेच आपण उमेदवार म्हणून जनतेसमोर असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे यांनी केले.

ते ढवळस, धर्मगांव , उचेठाण , बठाण व मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर प्रचार सभेत ते बोलत होते.

सिध्देश्वर आवताडे म्हणाले, माझी उमदेवारीही कोणाला निवडून आणण्यासाठी किंवा कोणाला पराभूत करण्यासाठी नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून मी निवडणूक लढवत आहे.

देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून जे प्रश्न आहेत. ते आजही कायम आहेत.स्वातंत्र्यापासून आजपर्यंत नुसते लोकांच्या प्रश्नाचे राजकारण झाले मात्र प्रश्न सुटले नाहीत.विकासाच्या गोंडस नावाभोवती तालुक्याचे राजकारण फिरत राहिले.

चाळीस धोंडा, तेल धोंडा, अरळी उपसा सिंचन योजना, गदयागाढव हे शब्द आता परवलीचे होवून बसले परंतू ते आजही सुटलेले नाहीत. एका बाजूला पक्षाच्या उमेदवारांचे लोक आहेत. तर दुसऱ्या बाजूला जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे.

संपूर्ण मंत्रीमंडळ व विरोधी पक्षाचे नेते मंगळवेढयात येवून गेले. गेल्या अनेक वर्षापासून सत्ता भोगलेली माणसे मंगळवेढयात रोजच येत आहेत. आज त्यांचेवर ही वेळ का आली आहे. त्यांनी जर विकास कामे केली असती तर आज त्यांना प्रचाराला यायची गरज पडली नसती.

हे सर्वजनता ओळखून आहे.त्यामुळे एकवेळ मला संधी दया, मी विकास काय आहे हे दाखवून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे चित्र बदलून दाखवतो अशी ग्वाही सिध्देश्वर आवताडे यांनी केली.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विठ्ठल घुले, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रा.समाधान क्षीरसागर, शेतकरी नेते सिध्देश्वर हेंबाडे, तालीम संघाचे संचालक नामदेव पडवळे यांचेसह मारुती गायकवाड , आनंदा मोरे , धन्यकुमार पाटील , आण्णा टकले , अनिल माने , साधू मोरे , नवनाथ बाडे , देवाप्पा हेंबाडे , पांडुरंग माने , अविनाश कुचेकर , पांडुरंग विभुते ,

गजानन आळगे , किशोर दत्तू , बाळू नागणे , अशोक पाटील , हणमंत पाटील , हरीभाऊ गडदे , समाधान माने , उत्तरेश्वर पाटील भाऊसाहेब गडदे , दत्तात्रय गडदे , शंकर पाटील , पोपट गडदे , बंडू भोसले , संजय बळवंतराव , मधुकर बेदरे , बाळासाहेब घोडके , ज्ञानेश्वर बाबर , धर्मा कोळी , धनाजी साठे , बापू भालेराव , परमेश्वर कोळी , पांडुरंग साठे , आप्पा कोळी , पांडूरंग बाबर व कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सिध्देश्वर आवताडे

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 30, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढ्यात ऐन उन्हाळ्यात गारपीट, पिकांचे मोठे नुकसान; वीज पडून तीन जनावरे ठार

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..