टीम मंगळवेढा टाईम्स ।
कंपनीतील कामगाराने ऑफीसच्या ड्रॉवरमधून कामगाराने तब्बल सात लाख रुपये रोख चोरून नेली. ही घटना दुपारी काळोखे पाटील चौक, विठ्ठलनगर, देहूगाव येथे उघडकीस आली.
संजय गंगाराम चौगुले (वय 35, रा. चिखली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार राजू चंद्रकांत राठोड (वय 45, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू राठोड हा फिर्यादी यांच्या टप प्लास्ट या कंपनीत काम करत होता.
त्याने कंपनीच्या ऑफिसमधील ड्रॉवर मधून सात लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.(स्रोत:MPC News)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज