mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! नगरपालिका कर्मचाऱ्याला मागितली 15 लाखांची खंडणी; माजी नगराध्यक्षावर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 5, 2023
in क्राईम, राज्य
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स। 

नियमबाह्य काम करून दे अन्यथा तक्रार करून निलंबन करण्याची धमकी देत 15 लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. विशेष म्हणजे माजलगावाच्या नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याला ही खंडणी मागण्यात आली असून, खंडणी मागणारा हा माजी नगराध्यक्ष आहे.

तर, या प्रकरणी नगरपालिका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून या खंडणी मागणाऱ्या माजी नगराध्यक्षाच्या विरोधात माजलगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मंजूर असे या माजी नगराध्यक्षाचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, बीडच्या माजलगाव नगरपालिकेमध्ये नामांतर विभागात प्रमुख म्हणून शिवहर शेटे हे काम पाहतात. यावेळी आरोपी शेख मंजूर यांनी नगरपालिकेच्या कार्यालयात येऊन नियमबाह्य काम करण्यासाठी शिवहर शेटे यांच्यावर दबाव टाकला.

मात्र, यावेळी हे काम करण्यास शेटे यांनी नकार दिला होता. त्यामुळे, शेख मंजूर यांनी शेटे यांना तात्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या घरी बोलावून घेतले. तसेच आपण सांगितलेले काम न केल्यास निलंबन करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

नियमबाह्य काम न केल्यास निलंबन करून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर देखील शेटे यांनी अनधिकृत कामे करण्यास नकार दिला. त्यामुळे शेख मंजूर यांनी शेटे यांच्याविरोधात वेगवेगळ्या तक्रारी करायला सुरुवात केली.

तसेच, शेटे यांच्या कुटुंबीयांवर देखील दबाव येऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत शेटे यांना या प्रकरणातील सर्व पुरावे घेऊन पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारावर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख मंजूर यांनी शेटे यांना आपल्या मर्जीनुसार नियमबाह्य करण्यास सांगितले, पण त्यांनी याला नकार दिला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पण, त्यानंतर देखील शेटे यांनी मंजूर यांचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी मंजूर यांनी वेगवेगळ्या तक्रारी करून त्रास देण्यास सुरुवात केली.

यामुळे शेटे यांचे परिवार भयभीत झाला होता. त्यामुळे, शेटे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी 4 जुलै 2023 रोजी बोलावून घेतले व पुरावे देण्यास सांगितले.

त्यानंतर आपण सर्व पुरावे पोलिसांना दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात शेख मंजूरविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केल्याचे शेटे यांनी म्हटले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खंडणी

संबंधित बातम्या

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयाचे आज जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवेढ्यात उद्घाटन; म्हैसाळ योजनेतील उर्वरित गावाचा पाणीवितरण बाबत शेतकरी मेळाव्याचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयाचे आज जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवेढ्यात उद्घाटन; म्हैसाळ योजनेतील उर्वरित गावाचा पाणीवितरण बाबत शेतकरी मेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्या

दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा