टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर आज दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी येणार असून
मंगळवेढा शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज सकाळी 11 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच मंगळवेढा तालुक्यातील टेंभू-म्हैसाळ योजनेतील उर्वरित गावांचा पाणी वितरण प्रश्न बाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
हुन्नूर ता.मंगळवेढा येथे शेतकरी संवाद व पाणी वितरण बाबत सविस्तर चर्चा सत्र होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी दिली.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, तसेच राष्ट्रवादीचे शेखर माने, मंगळवेढा राष्ट्रवादीचे प्रतिक सदस्य राहुल शहा, सहसचिव प्रदेश विजयकुमार खवतोडे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष ॲड.दत्तात्रय पाटील,
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्ष मुजम्मील काझी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, महिला तालुकाध्यक्ष संगीताताई कट्टे-पाटील,
माणिक गुंगे यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज