mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पालकांनो! ‘या’ जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट, 8 हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह; लहान मुलांवर कोरोनाचं सावट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 31, 2021
in आरोग्य, राज्य
धक्कादायक! मंगळवेढ्यातील आश्रमशाळेमधील ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून विविध पातळीवर उपाययोजना केली जात आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा फटका हा लहान मुलांना बसणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवरही प्रशासनानं उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान राज्यातल्या अहमदनगर मध्ये मे महिन्यात जवळपास 8 हजारहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली. कोविड- 19 च्या तिसऱ्या लाटेत संसर्ग कमी करण्यासाठी राज्यानं अतिरिक्त पावलं उचलली आहेत. ज्यात मुलांवर कमी परिणाम होईल.

सांगली जिल्ह्यात लहान मुलांसाठी खास कोविड-19 चा वॉर्ड तयार करण्याचं काम सध्या सुरु आहे. या वॉर्डमध्ये पाच मुलांवर सध्या उपचार सुरु असून अधिक लहान मुलांसाठी ही सुविधा तयार केली जात आहे.

आम्ही लहान मुलांसाठी कोविड वॉर्ड तयार केला आहे. जेणेकरुन जर तिसरी लाट आली तर आम्ही त्यासाठी तयार असू. तसंच आम्ही मुलांसाठी असा वॉर्ड तयार केला आहे की त्यांना रुग्णालयात नाही तर शाळेत किंवा नर्सरीमध्ये आल्याचा अनुभव येईल, असं नगरसेवक अभिजित भोसले यांनी म्हटलं आहे.

अहमदनगरमध्ये मे महिन्यात जवळपास 8 हजारहून अधिक लहान मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली. जिल्ह्यातील जवळपास 10 टक्के प्रकरणे नोंदली गेली. यानंतर प्रशासनानं आपली पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा प्रशासनानं आता तिसरी लाटेची तयारी सुरु केली असून सध्या बालरोग तज्ज्ञांशी बातचित सुरु आहे. फक्त मे महिन्यातच 8 हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. हे चिंताजनक असल्याचं अहमदनगरचे जिल्हाप्रमुख राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे तयार असणं आवश्यक असल्याचं आमदार संग्राम जगताप म्हणालेत.

जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरु केली. सध्या राज्य सरकारकडून जिल्हा पातळीवर चर्चा सुरु असल्याचंही बोललं जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोनाची तिसरी लाट

संबंधित बातम्या

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

महायुती सरकारचं मोठं पाऊल, ‘या’ शहरामध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास

June 18, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

धक्कादायक! नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील

June 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

June 15, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्त्व? ‘हम करे सो कायदा’ म्हणत मनमानी कारभार; प्रहार संघटनेचे राकेश पाटील यांचा थेट सरकारला सवाल

June 15, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
Next Post

गाव कोरोनामुक्त करताना पाटील हरले! मंगळवेढ्यातील पोलीस पाटलांचा आईसह बळी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

ब्रेकिंग! सुसाट कंटेनरने दुचाकी उडवली मंगळवेवेढ्यातील शिवसेनेचा आक्रमक आणि निष्ठावंत चेहरा काळाच्या पडद्याआड

June 18, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..