टीम मंगळवेढा टाईम्स।
दुचाकी अन् टेम्पोची जोराची धडक लागून महिला जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील उजनी गेटच्या समोर घडली होती.
दरम्यान अवजड वाहतुकीस शहरात बंदी असताना प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे राजरोस अवजड वाहतूक होत असून या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत नागरिकांनी मंगळवेढा -पंढरपूर मार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे.
कमल पांडुरंग साळुंखे (वय ५३, रा.जय भवानीनगर, संत चोखामेळा नगर, मंगळवेढा) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून पती पांडुरंग साळुंखे (वय.६१) हे या अपघातात जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पती पांडुरंग साळुंखे पत्नीला गोपनबाई बोराळे रोड येथील आज सकाळी पत्नीला सोडण्यास मोटरसायकल (एम एच १३ बीए ८१०९) वरून जात होते. याचवेळी दुचाकीला टेम्पोची धडक बसली. यात पत्नी जागीच ठार तर पती जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जड वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पक्षनेते अजित जगताप, राहुल सावजी, सुहास पवार , युवराज घुले, शंकर गांडूळे,
सोमनाथ बुरजे, पांडुरंग नकाते, हर्षद डोरले,विनायक कलुबरमे, प्रफुल्ल सोमदळे, मोहन हेबांडे, संभाजी घुले, दत्ता सारगर, अर्जुन ओमने यांच्या सह सप्तशृंगी नगर, चोखामेळा नगर, दामाजी नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज