mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

21 वर्षानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या एकत्रिकरणाचे सर्वत्र कौतुक; श्री संत दामाजी महाविदयालयात सन 2003 बॅचचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 7, 2024
in मंगळवेढा, मनोरंजन
21 वर्षानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या एकत्रिकरणाचे सर्वत्र कौतुक; श्री संत दामाजी महाविदयालयात सन 2003 बॅचचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा येथील विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविदयालयातील सन 2001 ते 2003 या बँच मधील बी.ए.बी.कॉम च्या विदयार्थ्यांनीएकत्र येऊन उत्साहात गेट-टुगेदर संपन्न केले. महाविदयालयाच्या प्रागंणात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी महाविदयालयाच्या 110 माजी विदयार्थ्यांनी एकत्रित येऊन हजेरी लावली व जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अनेकांनी एकमेकांना आनंदा अलिंगन दिले. या वेळी उपस्थितीत वर्गमैत्रिंनीना एकमेकींच्या भेटीमुळे आनंद आश्रृ आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्र.प्राचार्य औदुंबर जाधव हे होते. तर व्यासपिठावर माजी प्राचार्य मारुतीराव जगताप, माजी प्रा.वाघमोडे, प्रा.अशोक खोत, प्रा.करवंदे, प्रा. शहा, प्रा.आर.ए.पवार, प्रा.खंडागळे, प्रा. प्रा.शिवशरण, प्रा.आर.एन.जगताप, प्रा. नवनाथ जगताप, प्रा.गावकरे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रताप सावंजी आदीजण उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात संस्थेचे अध्यक्ष श्री.राहुल शहा व माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी भेट दिली.

यावेळी  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला तर   वाढत्या वयाचा दाखला देत 21 वर्षात मिळवलेल्या यशबद्दल व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर विद्यार्थ्यांनी सुध्दा आस्थेने आपल्या गुरुंची चौकशी केली.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्र.प्राचार्य औदुंबर जाधव यांनी विविध क्षेत्रात  यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे निमित्ताने प्रा. गावकरे यांनी महाविदयालयास यशाची माहिती दिली व माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयास मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

तर माजी प्राचार्य मारुती जगताप यांनी महाविदयालयाचे इमारत बांधकामापासून महाविद्यालयाच्या तत्कालीन शिस्तीबद्दलच्या आठवणीला उजाळा दिला. प्रा.शिवशरण यांनी गंमतीने इंग्रजी डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांची हजेरी घेत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात द्वितीय सत्रात मंगळवेढयाचे सुप्रसिध्द कवी इंद्रजित घुले व जीतेंद्र लाड यांनी सादर केलेल्या कवितांनी सगळयांची मने जिंकली. या गेट-टुगेदर चे निमीत्ताने सारिका दत्तु व तेजस्विनी राजमाने यांनी सादर केलेल्या नृत्याने वार्षिक स्नेहसंमेलनाची आठवण सुध्दा झाली तर  संगीत खुर्ची सारख्या फनी गेम्समुळे महाविद्यालयाीन जिवनात गेल्याचा आनंद मिळाला.

मिलींद आवताडे यांनी म्हंटलेल्या ‘पल पल दिल के पास’ या गाण्यामुळे तर अनेकांना ह्रदयाच्या नाजुक कोपऱ्यातील जुन्या मैत्रिणीची आठवण झाली.  कार्यक्रमाचे स्थळी सर्व विद्यार्थ्यांची माहिती स्क्रीनवर दिवसभर दाखवण्यात आली तर उभारण्यात आलेल्या दोन सेल्फी पाँईटवर फोटो काढयासाठी दिवसभर विद्यार्थ्यांची दंगामस्ती चालु होती. हे दोन्ही उपक्रम कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.

वये वाढली. आवाजात पोक्तपणा आला, सांसारिक व पारिवारीक जबाबदारी वाढली परंतु मनातील विद्यार्थी मात्र गप्प बसु देत नव्हता त्यामुळे अनेकजण आपसात चेष्टा मस्ती करीत असताना दिसत होते.

सदर कार्यक्रमाचे नियोजन राहिणी पवार, झाकीर काझी, विकास जाधव, आनंद मुढे, संदिप हजारे, अश्विनी नागणे, मेघाली सोनवले, रेश्मा जाधव, विनायक यादव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अतुल मुरडे, वासुदेव जाश्ेाी, संतोष अडगळ, रफीक मुल्ला,

सुधाकर माने, मधुकर मुरडे, मयुर यल्लाटीकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द कवि इंद्रजित घुले व प्रास्ताविक संतोष शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी नागणे यांनी मानले.

दिवस संपला, संध्याकाळ झाली तरी सुध्दा अनेकांचीपावले माघारी आपल्या घरी वळण्यास तयार नव्हती तरी सुध्दा जड अंतकरणाने पुन्हा भेटण्यासाठी या दिवसाची सांगता झिंगाट गाण्याच्या तालावर ग्रुपडान्स ने झाली.

21 वर्षाखालचा आनंद पुन्हा मिळाल्याचा उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर ठळपणे जाणवत होता तर या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनामुळे सर्वच आजी माजी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गेट टुगेदर

संबंधित बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
Next Post
अनिल सावंत यांना आमदार करून विधानसभेत पाठवा, मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचे नंदनवन करून शेतीला पाणी मिळवून देणार; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला शेतकऱ्यांना शब्द

अनिल सावंत यांना आमदार करून विधानसभेत पाठवा, मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचे नंदनवन करून शेतीला पाणी मिळवून देणार; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला शेतकऱ्यांना शब्द

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..