टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतात तणनाशक फवारणी का करतो अशी विचारणा केली असता ज्ञानोबा दगडू रणे यास ऊस तोडण्याच्या कोयत्याने मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सागर रामा रणे , सविता रामा रणे , शितल रामा रणे (सर्व रा.ब्रम्हपुरी) या तीघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील जखमी फिर्यादी ज्ञानोबा दगडू रणे हे दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा . त्यांच्या ब्रम्हपुरी येथील राहते घरासमोर उभे असताना
आरोपीने येवून शेतीचा वाद सुरु असताना व एकनाथ शिनगारे , रावसाहेब संभाजी रणे यांनी शेतीचा वाद मिटत नाही तोपर्यंत कोणीच वहिवाट करू नका असे सांगितले असताना
वाद असलेल्या शेतात तणनाशक फवारणी का करतो असे फिर्यादीने विचारले असता वरील आरोपीने ऊस तोडणीच्या कोयत्याने फिर्यादीच्या हातावर ,
उजव्या पायाच्या मांडीवर मारून गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक निंबाळकर करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज