मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहरातील सर्व नागरिकांना नगरपरिषदेमार्फत कळविण्यांत येते की, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.तसेच अत्यावश्यक कामासाठी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर कटाक्षाने करावा.मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरताना कोणतीही व्यक्ती निदर्शनास आल्यास रु.500 दंड केला जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली आहे.
मंगळवेढा शहरात 2 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये तसे केल्यास रु.500 दंड आकारण्यात येईल.तसेच परदेशातुन ,परराज्यातुन ,परजिल्ह्यातून आलेल्या लोकांनी स्वत:ला Home Quarantine करुन घ्यावे.
सदरचे व्यक्ती बाहेर आढळून आल्यास संबंधितांवर आपत्ती अधिनियम 2005 व महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 व साथ रोग अधिनियम 1897 अन्वये कारवाई करणेत येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच मंगळवेढा शहरातील सर्व नागरीकांना कळविण्यांत येते की, सध्या कोरोना (कोव्हीड-19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबतची कार्यवाही सुरु आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेमध्ये गर्दी होवू नये यासाठी शहरातील काही अडचणी/तक्रारी असल्यास नगरपरिषदेच्या टोल फ्री नंबर 18002332275 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आपल्या आसपास परदेशातील, परराज्यातील, परजिल्यातील नागरिक आल्यास अथवा ILI व SARI चा सर्व्हे करावयाचा राहुन गेल्यास सदर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे मुख्याधिकारी पल्लवी पाटील मँडम यांनी आवाहन केले.
————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज