टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाची
३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर ही मोटर सायकल चोरटयाने पळवून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी विकास काशिद (वय २७ रा. शिरसी ता. मंगळवेढा) हे भाविक महाशिवरात्री यात्रेनिमित्त दि.२० रोजी सायंकाळी ५.०० वा. दर्शनासाठी
एम एच १३ बी. एच. ०९५० या हिरो स्प्लेंडर मोटर सायकलवरून गेले होते. ही मोटर सायकल माचणूर येथील पाटबंधारे विभागाच्या असलेल्या कॉलनीचे लहान गेटजवळ लावून ते दर्शनासाठी गेले होते.
ते पुन्हा आल्यानंतर सदर ठिकाणी ३० हजार रुपये किमतीची मोटर सायकल जागेवर दिसून आली नाही.
सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज