टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मार्च अखेर सोलापूर विद्यापीठात पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाची तयारी सुरू आहे.
या अनुषंगाने स्मारक समितीच्या नवनियुक्त सदस्यांची मार्चच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १७ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या नूतन सदस्यांची नावे जाहीर केले.
नवीन सदस्यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पुतळा उभारण्यासंदर्भात चालू असलेला कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
नवनियुक्त समिती सदस्यांचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह शिवदास बिडगर, माऊली हळणवर, अमोल कारंडे, सुभाष मस्के, नागेश वाघमोडे,
बापूसाहेब मेटकरी, शरणू हांडे, श्री सोनटक्के , बापूसाहेब काळे आदी स्मारक समिती सदस्य उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज