mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरातील पाच तालुक्यांत आजपासून संचारबंदी, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध; काय सुरु, काय बंद?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 13, 2021
in सोलापूर, राज्य
Lockdown! राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढवला; 15 मे पर्यंत असणार कडक निर्बंध

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापुरातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या पाच तालुक्यात आजपासून संचारबंदी लागू होत आहे. या संचारबंदीला व्यापाऱ्यांचा मात्र विरोध आहे.

पंढरपूर व्यापारी महासंघाने संचारबंदीचे आदेश धुडकवात काळे झेंडे लावून दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कोरोना निर्बंधांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तालुक्यांचा उल्लेख करत येथील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं या तालुक्यांमध्ये संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार, सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून, म्हणजेच आजपासून पुढील आदेशापर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 4768 रुग्णांपैकी 4140 रुग्ण हे पंढरपूर, माळशिरस, माढा, सांगोला आणि करमाळा या तालुक्यातील आहेत. जाणून घेऊया जिल्हानिहाय आकडेवारी,

पंढरपूर : 1098 रुग्ण, माळशिरस : 849 रुग्ण, सांगोला : 915 रुग्ण, माढा : 784 रुग्ण, करमाळा : 494 रुग्ण

संचारबंदी दरम्यान काय सुरु, काय बंद?

सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कडक निर्बंध
13 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवांची दुकानं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार
अत्यावश्यक सेवांमध्ये नसलेली दुकानं पूर्णपणे बंद कोणतेही मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी

विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी,अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात पूर्णपणे संचारबंदी लागू खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतूक सुरु

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 5, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 5, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
Next Post
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

धक्कादायक! अज्ञात वाहनाच्या धडकेने मंगळवेढयातील तरूणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 5, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 5, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..