मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरात संचारबंदीचा आदेश असताना त्याचा भंग केला तसेच तोंडाला मास्क न लावता व्यक्तिगत व इतरांची सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य केल्याप्रकरणी हणमंत सोपान देवकर (वय ४०,शनिवार पेठ), अजित जालिंदर घाटूळ (वय ४०,मुरडे गल्ली) या दोघांविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,आरोपी हणमंत देवकर व अजित घाटूळ हे दि.६ रोजी ३ वा.मंगळवेढा शहरात संचारबंदी लागू असताना त्याचा भंग करून किल्ला भाग येथील काशीविश्वेवर मंदिरासमोरील कट्टयावर एकमेकांचेजवळ येवून खांदयावर हात टाकून एकत्र गप्पा मारत बसलेले असताना पोलिसांना मिळून आले.
दरम्यान,कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा अटकाव करण्यासाठी तोंडाला मास्क लावणे अपेक्षित होते.मात्र मास्कही लावलेले नाही.याची फिर्याद पोलिस शिपाई अनिल दाते यांनी दिली आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7588214814 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज