टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील साठे नगर येथे तलवार हवेत फिरवून दहशत निर्माण केल्या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात बबन उत्तम अवघडे (वय 35, रा.साठेनगर, मंगळवेढा) या तरुणा विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा शहरातील साठे नगर येथील सार्वजनिक चौकात आपल्या हातामध्ये लोखंडी तलवार घेऊन ती हवेत फिरवून,
तुम्ही मला अण्णाभाऊ साठे जयंतीचा अध्यक्ष का केले नाही? असे म्हणून लोकांना शिवीगाळ करून मोठ्याने आरडाओरडा करून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी
या व्यक्तीविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज